ICHMH51NEWS.IN
9921600800

वादातून दगड व फरशीचा तुकडा फेकून भावावर हल्ला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वादातून दगड व फरशीचा तुकडा फेकून भावावर हल्ला

इचलकरंजी :

सहकार नगर, साइट नंबर 102 येथे सख्ख्या भावावर गंभीर हल्ला झाला. फिर्यादी राजु बसाप्पा पाथरवट (वय ३६) यांच्या मते, आरोपी भरमा बसाप्पा पाथरवट यांनी नाराजी व्यक्त करत फरशीचा तुकडा आणि दगड त्यांच्यावर फेकले. “तु माझा फोन का उचलला नाहीस?” आणि “घरात सेट्रींगच्या प्लेटा ठेवून तू बागेत का गेला?” असे म्हणून चिडून ही कारवाई केली. या हल्ल्यात फिर्यादींच्या डोक्यावर, उजव्या हाताच्या तळहातावर आणि पायाच्या टाचेजवळ गंभीर जखमा झाल्या.

सदर प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास  पोसई संजय कांबळे करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा