About Us

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहर ही वस्त्रोद्योग नगरी आहे.इचलकरंजी मध्ये सुमारे १०० वर्षापूर्वी पहिला यंत्रमाग तयार झाला.या नंतर कापड तयार करणारे इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर समजले जाऊ लागले.आजही या शहरात दर्जेदार कापड निर्मिती होते.या शहराने अनेकांना रोजगार दिला आहे.देशभरातील नागरिकांनी इचलकरंजी शहरात येऊन आपली रोजीरोटी मिळवली आहे.व्यवसायात नाव कमावून इथे स्थायिक झाले असून या शहरात आजही कोट्यवधी मीटर कापड रोज तयार होते व जगाच्या कानाकोपऱ्यात जाते. इचलकरंजी शहराला सांस्कृतिक, राजकीय वारसा आहे. शहर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इचलकरंजी शहरातील रोजच्या ताज्या घडामोडीसोबतच शहराची विविधांगी माहिती, येथील शिक्षण,कला,राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या चालू घडामोडी तसेच इतिहास आपल्यापर्यत पोहोचवण्यासाठी आम्ही , ICHMH51NEWS हे न्युज पोर्टल सुरू केले आहे. निर्भिड पत्रकारितेच्या माध्यम स्वरूपात आम्ही आपल्या समोर येऊ, याच अपेक्षेसह आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत. TEAM ICHMH51NEWS

पुढे वाचा

Read More