कबनूरमध्ये हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने साठेनगर, कबनूर येथे कारवाई करत बिगर परवानाधारक हातभट्टी दारू विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका व्यक्तीस अटक केली आहे. महाराष्ट्र दारूबंदी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी राहुल सुरेश केगार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अभिजीत दादासो भोरे (वय २८, रा. आभार फाटा, साठेनगर, कबनूर) हा राहत्या घराच्या आडोशाला उघड्यावर गावठी हातभट्टीचे द्रव्य बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती मिळाली. कारवाईदरम्यान पोलिसांना निळ्या कॅनमध्ये अंदाजे १२ लिटर तयार हातभट्टी दारू, डॉक्टर ब्रँडच्या १० देशी दारू बाटल्या तसेच दारूच्या वासाचा काचेचा ग्लास असा एकूण १६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई २८ नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. कौलगे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







