ICHMH51NEWS.IN
9921600800

शंभूतीर्थ पाद्यपूजन संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शंभूतीर्थ पाद्यपूजन संपन्न

इचलकरंजी
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मलाबादे चौकात उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सकाळपासून धार्मिक विधी व कार्यक्रमांची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. या सोहळ्याला शहरातील मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
   कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली. छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी, सहकार भारतीचे विभाग सहसंघटक जवाहर छाबडा, विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री शिवजी व्यास, मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पाद्यपूजनाचा विधी पार पडला.
Advt
   यावेळी परिसर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला. माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, पुंडलिक जाधव, अरविंद माने तसेच महापालिकेचे अधिकारी यांच्यासह धारकरी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
   दरम्यान, अश्विनी कुबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार पेठ परिसरातील माता-भगिनींनी सवाद्य मिरवणुकीने गारवा आणला होता.
   या कार्यक्रमामुळे मलाबादे चौकाचे वातावरण धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी भावनेने भारावले होते. तर मुख्य रस्त्यावर दुतर्फा भगव्या पटका लावण्यात आल्याने परिसर भगवेमय झाले आहे.

शंभूतीर्थ पाद्यपुजन करताना गजानन महाजन,जवाहर छाबडा व मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा