ICHMH51NEWS.IN
9921600800

राष्ट्र सेवा दलामुळे सदानंद वर्देंसारखे निष्कलंक चारित्र्य असणारे नेते महाराष्ट्राला मिळाले – ललित बाबर 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्र सेवा दलामुळे सदानंद वर्देंसारखे निष्कलंक चारित्र्य असणारे नेते महाराष्ट्राला मिळाले – ललित बाबर 

इचलकरंजी:
“सदानंद वर्दे हे समाजाला वाहिलेले एक आयुष्य म्हणून समृद्ध होते, त्यांचे वैचारिक अधिष्ठान हीच आपली कार्यदिशा व्हावी अशी अपेक्षा साथी झेलमताई परांजपे राष्ट्र सेवा दल, कोल्हापूर जिल्ह्यावतीने साथी सदानंद वर्दे यांची जन्मशताब्दी साजरी करताना व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र सेवा दलाच्या ध्वजारोहणाने झाली. जिल्हास्तरीय आंतरशालेय पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन साथी के एम आवळे आणि साथी सदानंद वर्दे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले.शहर संघटक रोहित दळवी यांनी स्वागत केले. गीता साळुंखे आणि चंदन माटुंगे यांनी सेवा दल गाणी सादर केली. बाबासाहेब नदाफ यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून दिली.
अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसन देसाई यांनी साथी सदानंद वर्दे यांचे कार्य व आठवणी जागवल्या. मैदानी विभागाचे राज्य प्रशिक्षक धनंजय धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित बाबर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , राष्ट्र सेवा दलाच्या विचाराची आणि कामाची रुजवणूक तळागाळात होणेचा हा कालावधी आहे आणि हीच सदानंद वर्दे यांना दिलेली आदरांजली ठरेल.
यावेळी अनिल होगाडे, रावसाहेब आलासे, वसंतराव पाटील, गणपतराव फाटक, गीता खोचरे, इंद्रायणी पाटील, प्रा. शांताराम कांबळे, प्रमोद आवळे, विनया चनगुंडी, नौशाद शेडबाळे, बजरंग लोणारी, नितीन जाधव, संजय रेंदाळकर, सुनिल पोवार आणि सुनिल स्वामी उपस्थित होते.
स्नेहल माळी यांनी आभार मानले व रुचिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा