इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त विद्या कदम, सहा.आयुक्त रोशनी गोडे, माजी कामगार अधिकारी विजय राजापुरे, सहा.आयुक्त अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे,संदीप जोशी, संजय कांबळे, आदी उपस्थित होते.
संत संताजी जगनाडे महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




