ICHMH51NEWS.IN
9921600800

भाजपतर्फे इच्छुकांचे ४२७ अर्ज  जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपतर्फे इच्छुकांचे ४२७ अर्ज  जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्त

इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पार पडली असून संपूर्ण अहवाल (पूर्व) अध्यक्ष श्रीरंग खवरे व (पश्चिम) अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी  भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पूर्व (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष मा. श्री. राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्त केला.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, संघटन मंत्री श्री. मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. राहुल आवाडे व माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १ ते १६ पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पक्षात उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक प्रभागातून उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले.

प्रभागनिहाय अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे:
1 – 21, 2 – 27, 3 – 22, 4 – 25, 5 – 21,
6 – 40, 7 – 34, 8 – 23, 9 – 23, 10 – 27,11 – 15, 12 – 29, 13 – 42, 14 – 20, 15 – 20, 16 – 38.एकूण अर्ज : ४२७ (प्रभाग ६, ७, १३ आणि १६ मध्ये सर्वाधिक प्रतिसाद) ही अर्ज सूची पक्षाच्या आगामी उमेदवार निवड प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून पुढील काही दिवसांत उमेदवार निवड टप्प्याला सुरुवात होणार आहे.

अहवाल सादरीकरणावेळी शहराध्यक्ष (पूर्व) श्रीरंग खवरे व शहराध्यक्ष (पश्चिम) शशिकांत मोहिते उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा