ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज वाटपाला आजपासून सुरुवात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज वाटपाला आजपासून सुरुवात

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज गुरुवार, ११ डिसेंबरपासून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख रवींद्र माने,शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे,ज्येष्ठ नेते महादेव गौड यांनी दिली. आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुक उमेदवार पुढे येत असून प्रभागनिहाय आरक्षणानुसार उमेदवारी अर्ज झेंडा चौक येथील मातोश्री कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. हे अर्ज बुधवार १७ डिसेंबरपर्यंत स्वीकारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा वेग, जनहिताचा ठाम दृष्टिकोन आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा पोहचलेला लाभ यामुळे पक्ष तळागाळात अधिक बळकट झाल्याचे माने यांनी नमूद केले. वाढलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांची तयारी आणि मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता उमेदवारांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इच्छुकांनी विहित नमुन्यातील आरक्षण निहाय मागणी अर्ज पूर्ण कागदपत्रांसह वेळेत भरून जमा करावेत, असे आवाहनही जिल्हाप्रमुख माने यांनी केले असून, निवडणूक प्रक्रियेला शिस्तबद्ध आणि पारदर्शक रूप देण्याचा निर्धार शिंदे गटाने व्यक्त केला आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा