राज्यस्तरीय स्व-रचित काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी-
येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी ही संस्था गेल्या ३९ वर्षापासून नियमितपणे साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहे तसेच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ही संस्था ३३ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या दोन्ही संस्थांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘राज्यस्तरीय स्व-रचित काव्यलेखन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे.
नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेतील यशस्वी कवींना प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये, तृतीय क्रमांक दोन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपये अशी बक्षिसे व प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भाग घेणाऱ्या सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील तर प्रवेश फी शंभर रुपये राहील.
स्पर्धकांनी आपण स्वतः लिहिलेली एक मराठी कविता आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबरसह राजन मुठाणे, १८/८८९, जवाहरनगर पोस्ट ऑफिससमोर, स्टेशन रोड, इचलकरंजी या पत्त्यावर अथवा ९४२११७३१०१ या फोन नंबरवर पाठविणेची आहे. अधिक माहिती हवी असल्यास स्पर्धकांनी, कार्यवाह पवन चौगुले (फोन ९४२१२०४१५१) यांच्याशी संपर्क साधावा असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. कविता पाठविणेसाठी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून अधिकाधिक स्पर्धक कवींनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने वैशाली नायकवडे आणि घनश्याम सावलानी यानी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







