ICHMH51NEWS.IN
9921600800

महाविकास आघाडीच्या १६ ते १८ डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीच्या १६ ते १८ डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती

इचलकरंजी
आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची प्राथमिक छाननी पूर्ण केली असून १६, १७ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी मुलाखती घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

आघाडीच्या निवड प्रक्रियेत उमेदवारांचे पक्षातील काम, जनसंपर्क, निवडून येण्याची क्षमता तसेच पक्षाच्या मूलभूत विचारांशी असलेली निष्ठा यांचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत ताकदीचे, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनमानसात स्वीकारार्ह उमेदवार उभे करणे हे महाविकास आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येते.
महानगरपालिकेत गेल्या काही काळात वाढलेल्या भ्रष्टाचाराला पूर्णविराम देण्याच्या हेतूने काटेकोर उमेदवार निवड प्रक्रिया राबवली जात आहे.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष संजय जयवंतराव आवळेमदनराव कारंडेसंजय कांबळेराहुल खंजिरेउदयसिंग पाटील यांच्यासह अनेक तगडे इच्छुक उमेदवार अर्ज प्रक्रियेत सहभागी झाले असल्याची माहिती महाविकास आघाडीचे निमंत्रक शशांक बावचकर यांनी दिली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा