ICHMH51NEWS.IN
9921600800

पादचाऱ्यास ठोकर देऊन मृत्यूस कारणीभूत कारचालकाविरुद्ध शहापूर पोलिसांत गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पादचाऱ्यास ठोकर देऊन मृत्यूस कारणीभूत कारचालकाविरुद्ध शहापूर पोलिसांत गुन्हा

शहापूर:

पंचगंगा साखर कारखाना ते यड्राव फाटा रस्त्यावर १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी झालेल्या अपघातात ७६ वर्षीय सुभाष धर्मगोंडा पाटील यांचा मृत्यू झाला. ते पायी फिरत असताना चारचाकी MH-51-A-9117 ने पाठीमागून जोराची धडक दिली. वाहनचालक राजगोंडा धुळगोंडा पाटील (रा. यड्राव) हा अपघातानंतर न थांबता जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. फिर्यादी पुष्पराज पाटील यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा पो.हे.का. बांगर यांनी नोंदवला असून पुढील तपास पोसई कुटे करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा