ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची (उबाठा) समन्वय समिती जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची (उबाठा) समन्वय समिती जाहीर

इचलकरंजी –

आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाविकास आघाडीसोबत समन्वय साधण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन केली आहे. जिल्हाप्रमुख संजय धुळासाहेब चौगुले यांनी महाविकास आघाडी समन्वय समितीस पाठवलेल्या पत्राद्वारे ही माहिती दिली. आमदार सुनील प्रभू आणि संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेतील आवश्यक निर्णय घेणे आणि आघाडीतील सर्व घटक पक्षांशी प्रभावी संवाद राखणे यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समितीत शहरातील अनुभवी व सक्रिय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात सयाजी चव्हाण (शहरप्रमुख), मलकारी लवटे (उपजिल्हाप्रमुख), धनाजी मोरे (माजी शहरप्रमुख), दत्ता साळुंखे (उपशहरप्रमुख), अविनाश वासुदेव (युवासेना जिल्हासमन्वयक) व रतन वाझे (युवासेना शहरसमन्वयक) यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या आगामी सर्व बैठकीत या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याची विनंतीही चौगुले यांनी केली आहे. ​

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा