वीरशैव को-ऑप. बँक लि., कोल्हापूर (मल्टीस्टेट) ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
माजी नगराध्यक्षा सौ. अलका अशोक स्वामी यांची बिनविरोध निवड
इचलकरंजी
वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर (मल्टीस्टेट) या प्रतिष्ठित बँकेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक अलीकडेच बिनविरोध पार पडली. कोणताही वाद न होता सर्व जागांवर एकमताने निवड झाल्याने सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.
या निवडणुकीत महिला गटातून इचलकरंजीच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. अलका अशोक स्वामी तसेच सौ. विद्या राजेश पाटील (चंदुरकर) यांची बिनविरोध निवड झाली. सौ. अलका स्वामी यांच्या निवडीबद्दल लिंगायत समाजासह विविध सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील घटकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वाचा लाभ बँकेला आगामी कार्यकाळात नक्कीच होईल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला आहे.
सर्वसाधारण गटातून श्री. राजशेखर गुरुपादप्पा येरटे, श्री. सतिश शंकरराव घाळी, श्री. संदीप विश्वनाथ नष्टे, श्री. वैभव निळकंठ सावर्डेकर, श्री. अभिजीत अनिल सोलापुरे, श्री. राजेंद्र कल्लेश माळी, श्री. वरुण बाबासाहेब पाटील, श्रीमती श्वेता सदानंद हत्तरकी, श्री. सिध्दांत सुर्यकांत पाटील–बुध्दीहाळकर, सौ. सुषमा केतन तवटे, श्री. श्रीशैल्य दिलीप चौगुले, श्रीमती शशिकाला किरण निल्ले, श्री. रोहन राजेंद्र लकडे, श्री. चेतन बाळासाहेब देसाई, श्री. प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे व श्री. रविंद्र बाबुराव बनछोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अनुसूचित जाती-जमाती गटातून श्री. गुरुदेव चंद्रकांत स्वामी यांची निवड बिनविरोध झाली.
ही निवडणूक शांततेत व यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी श्री. गणपतराव पाटील (चेअरमन, दत्त सहकारी साखर कारखाना), श्री. नानासाहेब नष्टे व श्री. राजेश पाटील–चंदुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व समन्वयामुळे संपूर्ण प्रक्रिया एकोपा व सलोख्याच्या वातावरणात पार पडली.
नवीन संचालक मंडळाच्या माध्यमातून वीरशैव को-ऑप. बँक लि. अधिक सक्षमपणे कार्य करेल व सभासदांच्या हिताचे निर्णय घेत सहकार क्षेत्रात आपली विश्वासार्हता अधिक दृढ करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







