ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील शहापूर हायस्कूलमध्ये ५३ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील शहापूर हायस्कूलमध्ये ५३ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन

इचलकरंजी

इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत ५३ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन शहापूर हायस्कूल, शहापूर, इचलकरंजी येथे सोमवार दि. २२ व मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हे विज्ञान प्रदर्शन आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त शिक्षण श्रीमती विद्या कदम, शिक्षणाधिकारी श्री. बी. एम. कासार व प्रशासन अधिकारी श्री. इरफान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या प्रदर्शनामध्ये प्राथमिक गट, माध्यमिक गट, दिव्यांग गट, गणित शिक्षक तसेच प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर अशा पाच गटांमध्ये स्पर्धात्मक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इचलकरंजी व शहापूर परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या वैज्ञानिक संकल्पना, संशोधनाधारित प्रकल्प व नाविन्यपूर्ण मॉडेल्स सादर करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारा हा उपक्रम शैक्षणिक व विज्ञानमय वातावरणात यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास शहापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एच. आर. कांबळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या आयोजनात पर्यवेक्षक श्री. बी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह तसेच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांचे सहकार्य लाभले आहे.

इचलकरंजी शहर व परिसरातील सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी या विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण व कल्पक वैज्ञानिक संकल्पनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महानगरपालिका शिक्षण विभाग व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा