श्री दगडूलाल मर्दा फौंडेशनतर्फे रक्तदान उपक्रम संपन्न
इचलकरंजी:
येथील श्री दगडूलाल मर्दा चारिटेबल व रिसर्च फौंडेशन यांच्यातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे स्व. श्री दगडूलालजी मर्दा यांच्या ४९व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये १३१ युनिट रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
यावेळी मर्दा फौंडेशनचे मुख्य विश्वस्त भिकूलालजी मर्दा यांच्या हस्ते स्व. दगडूलालजी मर्दा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये शहरातील सुजाण नागरिक आणि मर्दा उद्योग समूहातील कर्मचारी यांनी स्वेच्छेने याप्रसंगी रक्तदान करण्यामध्ये सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबीर उपक्रमाकरिता येथील लायन्स ब्लड बँकेचे बहुमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा समारोप ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
रक्तदान शिबिराप्रसंगी घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







