” प्रबोधन प्रकाशन ज्योती “मासिकाचे प्रकाशन
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे नियमितपणाने प्रकाशित होणाऱ्या प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या डिसेंबर २०२५ या अंकाचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार डॉ.वसंत भोसले यांच्या हस्ते आणि या अंकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांच्यासह जयकुमार कोले ,शशांक बावचकर, राजन मुठाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मासिकाचा हा ४५७ वा अंक होता. या अंकामध्ये प्रसाद कुलकर्णी, डॉ.वसंत भोसले, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. दशरथ पारेकर ,जगदीश काबरे, संजीव चांदोरकर, डॉ .रफिक सुरज, डॉ .राम घुले आदींचे विविध विषयांवरील लेख समाविष्ट आहेत. तसेच कुसुमाग्रज व द.बा.धामणस्कर यांच्या कविता आहेत.मुखपृष्ठावर ज्येष्ठ कवी आणि चित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांचे चित्र आहे.
महाराष्ट्राच्या वैचारिक प्रबोधन चळवळीत मौलिक कामगिरी करणाऱ्या आणि दरमहा १५ तारखेला प्रकाशित होणाऱ्या या मासिकाच्या वतीने २०२५ या वर्षांमध्ये ९१० छापील पृष्ठांचे सकस साहित्य प्रकाशित केले आहे. येत्या जानेवारीपासून हे मासिक ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे मासिक जिज्ञासू नागरिक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी उपयुक्त असून त्याचे सर्वांनी वर्गणीदार वाचक बनावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे प्रकाशन करताना प्रा.वसंत भोसले,प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर,जयकुमार कोले,राजन मुठाणे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







