ICHMH51NEWS.IN
9921600800

घरफोडी प्रकरण उघडकीस : दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात, १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घरफोडी प्रकरण उघडकीस : दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात, १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी:
शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, तीन मोबाईल हँडसेट व मोटरसायकल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी सावली सोसायटी, शहापूर (ता. हातकणंगले) येथील रहिवासी महेंद्र छेडी यादव (वय ४८) यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी व त्यांची पत्नी झोपेत असताना पत्नीने गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र उशीजवळ ठेवले होते. ग्रील नसलेल्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र व मोबाईल फोन चोरून नेले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस पेट्रोलिंगदरम्यान विनानंबर मोटरसायकलवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून ८०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, २६,००० रुपये किंमतीचे तीन अँड्रॉईड मोबाईल व ८,००० रुपये किंमतीची बजाज 4S चॅम्पियन मोटरसायकल असा मुद्देमाल मिळून आला.
सखोल चौकशीत संबंधित अल्पवयीन बालकांनी सावली सोसायटीतील घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री. योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सचिन सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने केली.
पुढील ज्ञानेश्वर बांगर हे करीत आहेत.

ताब्यात घेतलेल्या आरोपींसह पो.नि. सचिन सूर्यवंशी व पोलीस

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा