ICHMH51NEWS.IN
9921600800

अंगारकी चतुर्थी निमित्त इचलकरंजीतून गणपतीपुळ्यासाठी थेट एस.टी. बस सेवा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंगारकी चतुर्थी निमित्त इचलकरंजीतून गणपतीपुळ्यासाठी थेट एस.टी. बस सेवा

इचलकरंजी :
जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या मंगळवार, दि. ०६ जानेवारी २०२६ रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त इचलकरंजी येथून श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जाणाऱ्या भाविकांसाठी थेट एस.टी. बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बस सकाळी ०६.०० वाजता इचलकरंजी बसस्थानकावरून सुटणार असून कोल्हापूर–मलकापूर–आरे–वारे मार्गे दुपारी १२.०० वाजता गणपतीपुळे येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी हीच बस त्याच दिवशी दुपारी ०३.०० वाजता गणपतीपुळ्याहून सुटून रात्री ०९.०० वाजता इचलकरंजी येथे पोहोचेल.
या बससेवेला शासनाने मंजूर केलेल्या सवलती लागू राहणार असून महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. सदर बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असून प्रवाशांनी इचलकरंजी बसस्थानकावरील आरक्षण केंद्र, MSRTC Bus Reservation App तसेच एस.टी. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इचलकरंजी व परिसरातील भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस.टी. प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा