ICHMH51NEWS.IN
9921600800

न्यायालयीन आदेशाचा भंग; बँक मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा प्रकरणी गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायालयीन आदेशाचा भंग; बँक मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा प्रकरणी गुन्हा दाखल

कोल्हापूर —
वीरशैव को-ऑप. बँक लि. कोल्हापूरच्या ताब्यातील मालमत्तेचा न्यायालयीन आदेशाचा भंग करून बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे अधिकृत अधिकारी नितीन दिनकर चरणकर (वय ५०, रा. माणगाव, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरून प्रमोद दिलीप काडाप्पा (वय ४३, रा. काडाप्पा मळा, कबनूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, आरोपीने मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, कोल्हापूर यांच्या आदेशाचा भंग करून बँकेच्या ताब्यातील मिळकतीवरील कुलूप तोडले, सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली व कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर अतिक्रमण करून मालमत्तेचा ताबा घेतला.
हा प्रकार २९ नोव्हेंबर २०२५ व १९ डिसेंबर २०२५ रोजी हातकणंगले तालुक्यातील चंदूर व कबनूर परिसरात घडला. गुन्ह्याची नोंद २० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा