घुसघोर बांगलादेशीना आश्रय देणाऱ्याना देशद्रोही ठरवा :- बजरंग दल
इचलकरंजी
हिंदू बांधव दिपू दास याची निर्घृण हत्या म्हणजे समस्त हिंदूंवर आघात करण्यासारखे आहे यामुळ भारत सरकारने इस्लामिक कट्टर पंथी घुसघोर बांगलादेशी यांना हिंदुस्थान मधून त्वरित हाकलून लावावे सोबतच या घुसघोरांना आश्रय देण्याऱ्यावर देशद्रोहा चे गुन्हे दाखल करावेत यासाठी बजरंग दल तर्फे आंदोलन करण्यात आले..
बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर इस्लामी जिहादी हल्ल्याचे प्रमाण निरंतर वाढत असून आपले हिंदूंचे मंदिर, व्यावसायिक केंद्र ,महिला, संपत्ती, शासकीय कर्मचारी , पत्रकार हे प्रामुख्याने त्यांच्या निशाण्यावर आहेत. हिंदूंच्या विरोधातील घटना ह्या प्रत्येक आठवड्याला निरंतर होत आहेत. हिंदूंविरोधी विविध प्रकारचे हिसंक हल्ले केले जात आहेत. मागील आठवड्यात मेमनसिंग जिल्ह्यातील भालुका गावात घडलेल्या घटनेने पूर्ण मानवतेला काळिमा फासला गेला. एक सामान्य हिंदू कामगार दिपू दास याच्यावर ईश्वरनिंदेचा खोटा आरोप लावून त्याची भर चौकात तेथील जिहादी मानसिकतेने जमावाकडून निष्ठुरतेने हत्या केली गेली.जमावाने त्याच्या मृतदेहाला झाडावर लटकून जाळून टाकण्यात आला. हा सर्व घटनाक्रम पोलीसांच्या समोर झाला, त्यांनी थांबवण्यातही प्रयत्न केला नाही एका अर्थाने त्यांना प्रोत्साहनच दिले आहे. तेथील प्रशासन कायम हिंदूवर झालेल्या अत्याचारांना पाठिंबा देत असून त्यांना प्रोत्साहन देत आहेत.एवढ्या वर न थांबता त्यांनी घटनेचा व्हिडिओ काढून जगभरात प्रसिद्ध केला .अशा प्रकारची क्रूर जिहादी हिंसा आणि प्रशासनाची निष्क्रियता याला विरोध करण्यासाठी तसेच हिंदूवरील होणाऱ्या अत्याचाराला लगाम घालावा आणि या अपराधी नराधमांना अधिक कडक शिक्षा करावी तसेच बांगलादेशातील असलेल्या अल्पसंख्याकांसाठी एक भीती आणि शोषणमुक्त वातावरण बनवणे या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे आंदोलन इचलकरंजी मध्ये करण्यात आले..
सदर आंदोलन प्रसंगी डांगरे मामा,भरत माळगे, दत्ता वायकोस, शुभम कालेकर, बाळासाहेब ओझा, शिवम सूर्यवंशी, संजय पाटील, समर्थ नाईक, मुकेश चौथे, दिगंबर भिलुगुडे, अमित पाटील, मुकुंद उरुणकर, रवी हुक्कीरे सोबतच विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे पदाधिकारी व बजरंगी मोठया प्रमाणात उपस्थित होते..
आंदोलन करताना बजरंग दलाचे कार्यकर्ते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







