मुख्यमंत्र्यांच्या भूलथापांना बळी पडू नका शिव-शाहु विकास आघाडीचे शहरवासियांना आवाहन
इचलकरंजी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस इचलकरंजी शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुक प्रचाराच्या निमिताने शहरात येत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन शिव शाहू विकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत सागर चाळके, मदन कारंडे व शशांक बावचकर यांनी केले.यावेळी ते पुन्हा शहराच्या पाणी प्रश्नावर व सुळकुड योजनेवर खोटे आश्वासन देऊन जनतेला भुरळ पाडण्याचा नेहमीचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे. वस्तुतः मा. देवेंद्रजी फडणवीस विधानसभा निवडणुकीपासून तीन वेळा इचलकरंजी शहरात येऊन गेले व प्रत्येक वेळी शहराच्या पाणी प्रश्नावर खोटे आश्वासन देऊन गेले. तोच प्रकार उद्याच्या प्रचार दौऱ्यात होण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा खोटे आश्वासन देऊन इचलकरंजी वासीयांची मते घ्यायची व सत्ता आल्यानंतर या प्रश्नावर सोयीस्कर मौन पाळायचे हा प्रकार शहरवासीयांना चांगलाच माहीत आहे. मुख्यमंत्र्यांना आश्वासन द्यायचे असेल तर ते कोणती योजना राबवणार, कुठून पाणी देणार, किती काळात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार याबाबतचा ठोस कार्यक्रम त्यांनी जाहीर करणे आवश्यक आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांचे आश्वासन म्हणजे ‘लबाडा घरचे अवतन’ आहे. असाच विचार शहरवासीय करतील.
त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना आमचे नम्र आव्हान आहे की केवळ निवडणुका व मतदान डोळ्यासमोर ठेवून सत्ता हस्तगत करण्याच्या हेतूने कोण पोकळ आश्वासन देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट करण्यात आले.यावेळी सदा मलाबादे,नागेश शेजाळे, रवी गोंदकर,नितीन भुते उपस्थित होते.
राहुल आवाडेना आ.बंटी पाटील यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही.- मदन कारंडे
आवाडे यांच्याकडे कित्येक वर्षे सत्ता असताना ते पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत त्यामुळे बंटी पाटलांवर बोलण्याची त्यांची नैतिकता नाही असे मदन कारंडे यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात जाऊन आंदोलन करू- सागर चाळके
आमची सत्ता आल्यास निधी न दिल्यास तसेच पाणीप्रश्नी मंत्रालयात जाऊन आंदोलने करू असा इशारा सागर चाळके यांनी दिला.
जनता दमदाटी खपवून घेणार नाही-शशांक बावचकर
आमची केंद्रात व राज्यात सत्ता आहे तुम्हाला निधी कोण देणार ही मग्रुरी व दमदाटीची भाषा खपवून घेतली जाणार नाही असे शशांक बावचकर यांनी सांगितले
पत्रकार परिषदेत बोलताना सागर चाळके
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







