श्री आर्य चाणक्य पतसंस्थेस जिल्ह्यातील उत्कृष्ठ संस्थेचा सन्मान
इचलकरंजी
सहकार भारती कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त होत असलेल्या सहकार सन्मान सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श व उत्कृष्ठ पतसंस्था म्हणून श्री. आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेची निवड करणेत आली.
सदरचा सहकार सन्मान सोहळा मंगळवार दिनांक ३०.१२.२०२५ रोजी जयसिंगपूर येथे मा. श्री. डॉ. उदयजी जोशी राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारती यांचे हस्ते प्रदान करणेत आला. सदरचा सन्मान श्री. आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र राशिनकर संचालक श्री जवाहरजी छाबड़ा श्री. शांतीनाथ शिरगावे, श्री. नरोत्तम लाटा, श्री. रामकिशोरजी भुतडा, व श्री. सुदर्शन कदम यांनी स्वीकारला.
या सोहळ्यास अध्यक्ष मा. श्री. विवेकजी जुगादे महामंत्री सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. शिरीष देशपांडे सहकार भारती पतसंस्था राष्ट्रीय प्रकोष्ठ प्रमुख उपस्थित होते. सदर सोहळा मा. श्री. संजय पाटील यड्रावकर नगराध्यक्ष, जयसिंगपूर नगरपालिका, मा. श्री. स्वप्नीलजी आवाडे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि., मा. सौ. वैशाली ताई आवाडे सहकार भारती महिला प्रकोष्ठ प्रमुख महाराष्ट्र प्रदेश, मा. श्री. सागर चौगुले सहकार भारती पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख, मा. अॅड. श्री. जवाहरजी छाबडा सह संघटक सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश, कोल्हापूर विभाग, व मा. श्री. चंद्रकांत धुलप संघटक सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कोल्हापूर जिल्हा यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
सन्मान स्वीकारताना राजेंद्र राशीनकर, जवाहर छाबडा व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







