ICHMH51NEWS.IN
9921600800

“महायुतीला सत्ता द्या; लागेल तेवढा निधी देऊ” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“महायुतीला सत्ता द्या; लागेल तेवढा निधी देऊ” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इचलकरंजी
पाणीप्रश्नाला प्राधान्य, इचलकरंजीच्या विकासकामांना मोठ्या निधीची हमी
इचलकरंजी — महायुतीला सत्ता दिल्यास शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याबरोबरच इचलकरंजीला रस्ते, सीईटीपी सहित विविध विकासकामांसाठी मोठा निधी दिला असून, पुढेही हा निधी वाढीव प्रमाणात देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
इचलकरंजीत झालेल्या रोड शोदरम्यान नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, तर महायुतीचे सर्व उमेदवार तसेच स्थानिक नेतृत्व मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील विकासाची गती अधिक वेगवान करण्यासाठी सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी नागरिकांना केले.
कार्यक्रमाला उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची उपस्थिती होती.
फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने आतापर्यंत इचलकरंजीच्या पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रकल्प आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात शहराला आणखी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन विकासकामे गतिमान केली जातील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

रोड शो दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खा धैर्यशील माने,प्रकाश आवाडे,सुरेश हाळवणकर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा