कोल्हापूरच्या माहेश्वरी मुलींची नागपूरमध्ये चमक; महिला क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपदाची कामगिरी
इचलकरंजी
अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनतर्फे आयोजित “खेल महोत्सव २०२५” मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील माहेश्वरी समाजातील मुलींनी उज्वल कामगिरी नोंदवत समाजाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. नागपूर येथे २५, २६ व २७ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात महाराष्ट्र राज्याच्या महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना या मुलींनी उत्कृष्ट खेळ करीत स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र राज्य माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष श्री. विनीतजी तोष्णीवाल यांच्या नेतृत्वाखाली संघाने प्रभावी कामगिरी सादर केली. या संघातील सर्व खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने समाजात समाधानाची आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
या विजयी कामगिरीच्या स्मरणार्थ कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनतर्फे विशेष सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले. खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महिला क्रिकेट संघातील खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे —
• श्रीमती प्रियांका सर्वेशजी मालानी (कर्णधार)
• सौ. प्रिया शुभमजी खटोड
• मीनाक्षी रामचंद्रजी मोहता
• परिनिधी अनिलकुमारजी भुतडा
• पलक पवनजी काबरा
• रिद्धी निलेशजी भुतडा
• विधी अमितजी कोठारी
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवक संघतर्फे सर्व खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि पुढील स्पर्धांमध्ये आणखी मोठे यश मिळविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सन्मान स्वीकारताना यशस्वी विद्यार्थीनी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








