हिप्परगी धरणाचा दरवाजा वाहून गेल्याने इचलकरंजीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
इचलकरंजी:
हिप्परगी धरणाचा मुख्य दरवाजा वाहून गेल्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी अत्यंत खालावली आहे. परिणामी, इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी उपसा केंद्रातून पाणी उपसा करण्यावर निर्बंध आले आहेत.
या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे विभागास दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले असून, राजापूर धरणाचे बरगे बसविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाटबंधारे विभागामार्फत राजापूर धरणावर बरगे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम शनिवार दि. १० जानेवारी रोजी दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
बरगे बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कृष्णा नदीची पाणीपातळी वाढेल आणि शनिवार सायंकाळपासून पाणी उपसा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून व काटकसरीने वापरावा, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







