ICHMH51NEWS.IN
9921600800

आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून तारदाळ-निमशिरगांव प्रलंबित रस्त्यासाठी ५  कोटी रुपये मंजूर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून
तारदाळ-निमशिरगांव प्रलंबित रस्त्यासाठी ५  कोटी रुपये मंजूर

तारदाळ –
प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असणारा आणि विविध कारणांनी रखडलेला तारदाळ-निमशिरगांव हा रस्ता लवकरच कात टाकणार आहे. या रस्ता कामासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून नाबार्डकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दोन्ही गावांना जोडणार्‍या या रस्त्यामुळे दळणवळणाला चालना मिळणार आहे. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तारदाळ ते निमशिरगांव हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे. परंतु तो कमी रुंदीचा आणि वाहतुकीसाठी योग्य असा नसल्याने हा रस्ता करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. शिवाय आहे या मार्गावर वाहतुक कोंडी ही नित्याचीच बनते. त्यामुळे वाहनधारकांना आणि दररोज ये-जा करणार्‍यांना निमशिरगांवहून तारदाळ किंवा तारदाळहून निमशिरगांवकडे जाण्यासाठी हातकणंगले अथवा कोंडीग्रे फाटा मार्गे जावे लागत होते. या लांबपल्ल्यामुळे वेळ वाया आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे रुंदीकरणासह रस्ता करण्यासाठी आवश्यक  निधी उपलब्ध करुन देण्याबाबत पाठपुरावा सुरु केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून नाबार्डकडून ५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
या रस्त्यामुळे तारदाळ ते निमशिरगांव मार्गावरील वाहतूक  सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा