ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात सॅनिटरी पॅड मशीनचे उद्‌घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात सॅनिटरी पॅड मशीनचे उद्‌घाटन

इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील महिला सबलीकरण विभागाच्या वतीने सॅनेटरी पॅड मशीनचे उद्‌घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
कन्या महाविद्यालय हे  इचलकरंजी आणि परिसरातील एकमेव मुलींचे महाविद्यालय आहे.
या महाविद्यालयांमध्ये खास मुलींच्या सुविधेसाठी सॅनेटरी पॅड मशीनची नितांत आवश्यकता होती. त्यासाठी इचलकरंजीमधील प्रसिद्ध अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाच्या माध्यमातून मा. श्री चंद्रप्रकाश छाजेड यांच्या प्रयत्नातून महाविद्यालयासाठी ही मशीन उपलब्ध झाली. आज या मशीनचे उद्‌घाटन करण्यात आले.
अडचणीच्या काळामध्ये या विद्यार्थिनींना या मशीनचा उपयोग होणार आहे. याशिवाय महाविद्यालयात नेहमीच विद्यार्थिनींचे हित लक्षात घेऊन नवीन उपक्रम राबवले जातात. त्यातीलच हा एक उपक्रम आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक महिला सबलीकरण विभागप्रमुख डॉ. अनिता आंबोकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा पैलवान यांनी केले तर आभार प्रा. स्वाती हळवणकर यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सॅनिटरी पॅड मशीनचे उद्घाटन करताना प्रा.त्रिशला कदम

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा