ICHMH51NEWS.IN
9921600800

साहित्यिकानी मराठी भाषेला सातासमुद्रापार नेले, याचा आम्हास अभिमान आहे..-श्री.अशोक दास यांचे प्रतिपादन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

साहित्यिकानी मराठी भाषेला सातासमुद्रापार नेले, याचा आम्हास अभिमान आहे..-श्री.अशोक दास यांचे प्रतिपादन.

इचलकरंजी
रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबोस क्लब , इचलकरंजी यांच्या वतीने नाकोडा नगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात  मराठी भाषेचे अभ्यासक व गोविंदराव हायस्कूल चे माजी अध्यापक श्री अशोक दास सर यांचे साहित्यिकांच्या सहवासात या विषयावर बोलताना मराठी भाषा आपली मायबोली असुन संत ज्ञानेश्वरांच्या पासून ते आजच्या नवजात मराठी लेखकांनी मराठी भाषेला सातासमुद्रापार नेले आहे हा माय मराठीचा गौरव आहे, आपल्या जीवनात कवी कुंज बिहारी, कुसुमाग्रज,ग.दि.माडगुळकर.आणि पु.ल.देशपांडे,द.मा.मिरासदार, प्राचार्य शिवाजीराव भोसले, शंकर पाटील,वि.स.खांडेकरपासुन जेष्ठ कवियत्री इंदिरा संत यांचा सहवास मिळाला आणि माझे जीवन समृद्ध झाले या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. साहित्य विश्वातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. इचलकरंजी ही वस्त्र नगरी असूनही साहित्य मध्ये ज्या ज्या गोष्टी चालू केल्या, त्या आजपर्यंत चालू असून, आपटे वाचन मंदिर आणि बालकृष्ण बुवा संस्कृतीक केंद्र हे साहित्य आणि संस्कृतीचे प्रमुख केंद्र आहे. इचलकरंजीच्या भूमीमध्ये मराठी साहित्य परिषदेत झाली होती हा इचलकरंजीचा गौरव आहे.
प्रारंभी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत श्री रामचंद्र निमणकर सर यांनी केले, प्रास्ताविक सेक्रेटरी श्री किरण कटके यांनी केले,तर प्रमुख पाहुणे श्री अशोक दास यांचा परिचय श्री जयप्रकाश शाळगावकर यांनी करून दिला, संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले, अध्यक्ष स्थानी श्री सुनिल कोष्टी हे होते.
आभार सह-सेक्रेटरी सौ.संगिता लडगे यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्वश्री शिवबसु खोत, काशिनाथ जगदाळे,डी.एम.बिरादार, डॉ.कुबेर मगदुम, जुगलकिशोर तिवारी, ॲड.विश्वासराव चुडमुंगे, अशोक पाटील, जगन्नाथ पोटे, वैभव डोंगरे, प्रमोद लाटणे, श्रीकांत कगंळे, विजय पोवार, अनिल ज्वारे, आनंदा मेटे,रमेशभाई पंड्या, रामदास कोळी, बापुसाहेब घुले, मल्लिकार्जुन तेग्गी, लक्ष्मण घंटा, काशिनाथ टकले,अरुण केटकाळे, विजय बनसोडे, ज्ञानदेव मेटे, बालमोहन कित्तुरे, राजेश पिष्टे,, जयश्री चौगुले, दिपाली कोळी, नीता दोड्डणावर, माधवी कुलकर्णी,एषीबेन पंड्या, मंजुळा कांबळे,मनिषा कोष्टी, माया होगाडे, गीता लाटणे, मंगल डोंगरे, उज्वला आगरे, राजश्री वाटेगावे, प्राजक्ता होगाडे, आनंदी हजारे,लिलावती बिरादार डेझी कुरणे, आशालता पाटील इत्यादी सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
अशोक दास यांचे स्वागत करताना प्रकाश सातपुते व सुनील कोष्टी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा