कन्या महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न…..
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन
इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीतील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व शाखांमध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह 12 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा महाविद्यालय, कापशीचे मराठी विभागप्रमुख डॉ. स्वप्निल बुचडे हे उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थिनींना आपल्या आयुष्यात स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान किती महत्त्वाचे आहे, स्वामी विवेकानंदांचे विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये आधारस्तंभ बनवले पाहिजेत, याशिवाय स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या आत्मविश्वास,धैर्य, उठा,जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, या बाबी सांगून आपल्या नेहमी लक्षात असले पाहिजे. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपण आपल्याच अधोगतीकडे जातोय तर सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपण आपल्या सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे हे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ त्रिशला कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींना सध्याच्या परिस्थितीमध्ये श्री स्वामी विवेकानंद यांचे विचार अंगिकारण्याची गरज आहे. एक आदर्श युवक कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. त्यामुळे ते जसं ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराने परिपूर्ण होते तसेच आपलं आयुष्य असावं, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अनिता आंबोकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. स्वाती हाळवणकर यांनी केले. आभार डॉ.विठ्ठल नाईक यांनी मानले.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. वर्षा पोतदार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

डॉ स्वप्निल बुचडे यांचे स्वागत करताना प्राचार्या त्रिशला कदम
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800