ICHMH51NEWS.IN
9921600800

बँकर्स प्रिमियर लिग हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी संघ चषकाचा मानकरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बँकर्स प्रिमियर लिग हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी संघ चषकाचा मानकरी

इचलकरंजी-
        येथील शेळके मळा, आरसी टर्फ येथे इंटरबँक ‘भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा’ १८ जानेवारी रोजी आयोजित करणेत आली. सदर स्पर्धेतील सर्व चषकाचे स्पॉन्सर यड्राव को-ऑप. बँक लि., यड्राव असून या स्पर्धेत श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस रक्कमेसह चषकावर आपले नाव कोरले.
      सदर स्पर्धत श्री आदिनाथ बँक, यड्राव बँक, सन्मती बँक, दि इचलकरंजी मर्चट बँक व नांदणी बँक या सहकारी बँकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला होता. अंतिम सामन्यात श्री आदिनाथ बँक संघाने प्रतिस्पर्धी सन्मती बँक संघावर निर्णायक विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. संघातील खेळाडूंनी फलदांजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट समन्वय दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
      या यशाबद्दल श्री आदिनाथ बँकेचे चेअरमन श्री. बाळासाहेब चौगुले, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व सर्व कर्मचा-यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. खेळामुळे संघभावना, शिस्त व आरोग्य संवर्धनास चालना मिळते असे मान्यवरांनी मत व्यक्त केले.
आदिनाथ बँकेचा विजयी क्रिकेट संघ
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा