ICHMH51NEWS.IN
9921600800

जयवंत महाविद्यालयात २३ जानेवारीला ‘भारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जयवंत महाविद्यालयात २३ जानेवारीला ‘भारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

इचलकरंजी :
येथील जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयवंत महाविद्यालय आणि कोल्हापूर येथील निर्मिती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी ‘भारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता’ या विषयावर एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाच्या स्वीकृतीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना संविधानिक मूल्यांवर शैक्षणिक व सामाजिक पातळीवर विचारमंथन व्हावे तसेच संविधानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर यु. जमादार असतील. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे, दिल्ली येथील डॉ. मिलिंद आव्हाड, गुजरात येथील डॉ. मनीष वाघेला तसेच अहिल्यानगर येथील मा. स्मिता पानसरे उपस्थित राहणार आहेत.
समारोप सत्रासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार असून, सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे असतील. प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य व्ही. एम. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्रात गोवा येथील डॉ. श्रीकृष्ण आडसुळ आणि परभणी येथील डॉ. सुरेश शेळके हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विचार मांडणार आहेत.
या राष्ट्रीय चर्चासत्रात प्राध्यापक, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. संजयदादा आवळे व प्रशासन अधिकारी श्री. संजय भोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अधिकाधिक संशोधक, अभ्यासक व नागरिकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य समन्वयक डॉ. वैजयंता पाटील, डॉ. वसंत भागवत आणि डॉ. कपिल सजहंस यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा