ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत श्री साई सेवा मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत श्री साई सेवा मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन

इचलकरंजी
इचलकरंजी वस्त्रनगरीतील श्री साई मंदिराच्या स्थापनेत मोलाचे योगदान देणारे सच्चे साई भक्त श्री. धोंडीराम कोष्टी (कुरकुटे दादा) यांच्या हस्ते श्री साई सेवा मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त सालाबादप्रमाणे ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ध्वजवंदनानंतर देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी साई भक्त परिवारातील श्री. विठ्ठल दुर्गाडे, मल्लाप्पा कोळी, शंकर बागडे आदींच्या हस्ते संयुक्तरीत्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी साई सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच साई भक्त परिवारातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततामय, शिस्तबद्ध व भक्तीमय वातावरणात पार पडला.

ध्वजवंदन कार्यक्रमावेळी उपस्थित साई भक्त

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा