उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या निधनाने इचलकरंजीवर शोककळा,मान्यवरांचे शोकसंदेश
इचलकरंजी
बारामती येथे विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्यासह ५ जनांचा अपघाती मृत्यू झाला,महाराष्ट्राला बसलेला हा मोठा धक्का असून इचलकरंजीसह आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली.शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी आपल्या आठवणी जागवत श्रद्धांजली अर्पण केली.आज ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अजित दादांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक अपघाती निधन हे सर्वांना धक्का देणारे असे आहे. राजकारणात स्वतःचे परखड मत मांडणारे, बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणत परिणामांची तमा न बाळगता स्पष्टपणे निर्णय घेणारे नेते होते. इचलकरंजीच्या कृष्णा योजना बळकटीकरणातील 8 किलोमीटरचे काम पूर्णतः शासन खर्चातून करून देण्यात अजितदादांचे मोलाचे सहकार्य लाभले. पवार आणि आवाडे घराण्याचे कौटुंबिक नाते त्यांनी जपले होते. त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला राजकारण विरहित मदत करण्याची भूमिका जोपासली होती.
– प्रकाश आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तमाम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि स्पष्ट वक्तेपणा असणारे नेते होते. आमदार म्हणून काम करताना मला त्यांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रश्नांची त्यांना जाण होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राज्याची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेलो आणि रिकाम्या हाती परतलो असे कधीच घडले नाही. इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य दिले. सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ व त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आज आपल्यातून हरपला आहे. – राहुल आवाडे, आमदार इचलकरंजी विधानसभा
आ.राहुल आवाडे भावुक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







