ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरातर्फे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कारासाठी आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरातर्फे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कारासाठी आवाहन

इचलकरंजी:
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे बाचन मंदिराच्यावतीने दरवर्षी त्या त्या वर्षातील उत्कृष्ट काव्यसंग्रहास दिल्या जाणा‌ऱ्या इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारासाठी तसेच लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कारासाठी प्रकाशक व कवींना त्यांचे काव्यसंग्रह पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट गद्य व लक्षणीय गद्य पुरस्कारासाठी गद्य साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह व उत्कृष्ट गदय पुरस्कारासाठी रु.१००००/- व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच उत्कृष्ट पदय साहित्यकृतीमधील दोन लक्षणीय काव्यसंग्रह वसंतराव दातार व सुलभा मगदूम यांच्या नावे दोन लक्षणीय काव्यसंग्रहांना जाणार आहे. प्रत्येकी रु. ४०००/- व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुपं आहे. गदय साहित्यकृतीमधील दोन लक्षणीय गदय साहित्यकृतींना. रु. ४०००/- व गौरवपत्र असे लक्षणीय पुरस्काराचे स्वरुप आहे. याशिवाय ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट कथासंग्रहास सौ. आशाताई सौंदत्तीकर यांच्या नावे उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार जाणार आहे. रुपये १००००/- व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच कादंबरीसाठी विनायकराव श्रीपाद देशपांडे यांच्या नावे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिला जाणार आहे. रु. १००००/- व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. भारतीय लेखकांच्या अन्यभाषेतील साहित्याचा मराठी भाषेतील अनुवादित साहित्यकृतीसाठी महादेव बाळकृष्ण जाधव यांच्या नावे उत्कृष्ट अनुवादित पुरस्कार दिला जाणार आहे. रु. १००००/- व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ललितगद्य साहित्यकृतीसाठी सौ. वसुंधरा मुकुंद अर्जुनवाडकर यांच्या नावे उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार दिला जाणार आहे. रु. १००००/- व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे, उत्कृष्ट बालसाहित्यासाठी पार्वती शंकरराव तेलसिंगे यांच्या नावे रु. ६०००/- व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच रागिणी दादासो जगदाळे यांच्या स्मरणार्थ युवा पद्मरत्न पुरस्कारासाठी रु.५०००/- व गौरवपत्र असे स्वरुप आहे. (या पुरस्कारासाठी वय ३० वर्षाच्या आतील असावे सोबत पॅनकार्ड आवश्यक आहे.)
१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेल्या मराठी साहित्यकृतींचा (प्रथम आवृत्ती) या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. लेखक/कवी अथवा प्रकाशकाने आपल्या साहित्यकृतींच्या दोन प्रती कार्यवाह, आपटे वाचन मंदिर, ३/५६९, राजवाडा चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर या पत्त्यावर दि. २० फेब्रुवारी २०२६ अखेर पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन आपटे वाचन मंदिराचे अध्यक्ष सौ. सुषमा दातार व इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचे सचिव डॉ.श्रीवल्लभ मर्दा यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा