ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी पोलिसांच्या कारवाईत मोटरसायकल चोरीचे ७ गुन्हे उघड,१.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी पोलिसांच्या कारवाईत मोटरसायकल चोरीचे ७ गुन्हे उघड,१.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

व्हिडीओ- https://youtube.com/shorts/_Ek9pbLTBrg?si=bNSzVixf7nrNpEVW 

इचलकरंजी :
इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १,५९,८०० रुपये किंमतीच्या चोरीच्या ७ मोटरसायकली जप्त केल्या असून, मोटरसायकल चोरीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी संतोष मारुती फासे (वय ३३, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यास अटक करण्यात आली आहे.
दि. २ डिसेंबर २०२५ रोजी विकली मार्केट परिसरात साईसमर्थ क्लिनिकल लॅबोरेटरीसमोरून एच.एफ. डिलक्स मोटरसायकल चोरीस गेल्याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन सांगली नाका परिसरात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सांगली नाका येथील अकरा रुद्र हनुमान मंदिराजवळ सापळा रचून संशयित संतोष फासे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सदर मोटरसायकल तसेच मागील दोन वर्षांत इचलकरंजी व कोल्हापूर परिसरात आणखी मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर आरोपीकडून एच.एफ. डिलक्स, होंडा युनिकॉर्न, होंडा सीबी शाईन, हिरो होंडा सीडी डिलक्स, हिरो पॅशन प्रो व होंडा अॅक्टीव्हा अशा एकूण ७ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे इचलकरंजी, शिवाजीनगर, गांधीनगर व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांतील विविध गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरील कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहे कॉ. अनिल पाटील करत आहेत
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा