ICHMH51NEWS.IN
9921600800

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज तारदाळ येथे जाहीर सभा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज तारदाळ येथे जाहीर सभा

 
इचलकरंजी:
कोरोची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने रविवार १ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तारदाळ (ता. हातकणंगले) येथे येत आहेत. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तारदाळ येथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा महायुतीतर्फे कु. सानिका राहुल आवाडे, कोरोची पंचायत समिती मतदारसंघात सुमेध उर्फ सनी ओऊळकर आणि तारदाळ पंचायत समिती मतदारसंघात सौ. प्रियांका प्रविण खोबरे हे निवडणूक लढवत आहेत. तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर नजीकच्या चंदूर, कबनूर, पट्टणकोडोली मतदारसंघातही महायुतीने मुसंडी मारली. या सर्वच उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार १ फेब्रुवारी रोजी तारदाळ येथे येत आहेत. यावेळी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार असून जाहीर सभेस महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा