ICHMH51NEWS.IN
9921600800

संत गजानन महाराजांच्या १४८ वा प्रगट दिनानिमित विविध उपक्रमांचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संत गजानन महाराजांच्या १४८ वा प्रगट दिनानिमित विविध उपक्रमांचे आयोजन

इचलकरंजी:
लोकभावनेतून साकारलेल्या ब्रह्मचारी संत गजानन महाराज मंदिर, मंदाताई नवरे येथे श्रींचा १४८ वा प्रगट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावात साजरा होत आहे.
या निमित्ताने सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता परमपूज्य महाजन गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. सकाळी ९.०० वाजता सौ. रुपाली बुगड (नगरसेविका) व ज्योती पागडे मॅडम (किशोर करिअर अकॅडमी) यांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता माननीय अनिल डाळ्या (नगरसेवक, इचलकरंजी महानगरपालिका) व माननीय नंदकिशोर भुतडा (अध्यक्ष, चाणक्य अंत्यसंस्कार केंद्र) यांच्या हस्ते पारायणाचा शुभारंभ होणार आहे.
गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण दररोज सात अध्यायांप्रमाणे सकाळी ९ ते ११ व दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार असून, यावेळी विविध महिला भजनी मंडळांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दि. २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी हे पारायण सौ.सुवर्णा कोळेकर (कुरुंदवाड) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
मुख्य सोहळा रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार असून सकाळी ६ ते ८ श्रीनाथ दुग्धाभिषेक, सकाळी ९ ते १० गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण, सकाळी १० ते १२ युवा कीर्तनकार दीपक बरगाले महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. महाप्रसादाचे वितरण प्रकाश आण्णा आवाडे (माजी मंत्री), मा. सुरेशराव हाळवणकर (माजी आमदार), मा. आप्पासाहेब तांबे, मा. भगतरामजी छाबडा, मा. मुकुंद फाटक, मा. राजगोंडा पाटील, मा. प्रकाश दत्तवाडे व मा. नंदकुमार पाटील (माजी नगरसेवक) यांच्या हस्ते होणार आहे.
सायंकाळी ५ ते ६ पालखी सोहळा, त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता नित्य आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. परिसरातील सर्व भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे श्री. भाऊसाहेब पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा