श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात इ. १२ वीच्या विद्यार्थिनींचा शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न.
इचलकरंजी :
श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे शनिवार दि.३१ जानेवारी २०२६ रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींचा ‘शुभचिंतन समारंभ’ अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. श्री. दत्तात्रय घाटगे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्राचार्यांचे स्वागत ज्युनियर विभागप्रमुख प्रा.सोनाली बोरगावकर यांनी केले.
सायली देसाई, तय्यबा भातखंडे, सिद्धेश्वरी पाटील, गौरी कांबळे, संस्कृती डोणे व ऋतुजा चौगुले यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि भावी स्वप्ने मनमोकळेपणाने व्यक्त केली. कृतज्ञता, आत्मविश्वास आणि भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन सर्व शिक्षकांच्याकडून मिळाल्याचे सांगितले.
प्रा. सोनाली बोरगावकर यांनी मनोगतातून विद्यार्थिनींशी भावनिक नाते जपणारे विचार मांडले. महाविद्यालयातील सुसज्ज इमारत,स्मार्ट क्लासरूम, सॅनिटरी वेंडिंग मशीन यांसारख्या सुविधा विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी शुभचिंतन समारंभ केवळ औपचारिक नसून विद्यार्थिनींसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.सर्व परीक्षांचे महत्त्व, अभ्यासाचे योग्य नियोजन व तणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
तसेच महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची माहिती दिली.तसेच ब्युटीपार्लर, विणकाम, भरतकाम, मेहंदी, शिवणकाम, संगणक शिक्षण व मोडी लिपी वर्ग असे सर्व कोर्सेस विद्यार्थिनींसाठी विनामूल्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वर्गीय प्रा. रेखा माळी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भगिनी विमल माळी यांनी महाविद्यालयास ७ लाख रुपये देणगी दिल्याचे सांगितले. तसेच श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे कन्या महाविद्यालयाचा विकास झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. मुडशी यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा.मनिषा गवळी यांनी केले. कार्यक्रमाला स्मिता साळुंखे, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हा शुभचिंतन समारंभ विद्यार्थिनींना आत्मविश्वास, प्रेरणा आणि यशाचा मार्ग दाखवणारा ठरला अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

मनोगत व्यक्त करताना सोनाली बोरगावकर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800