ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लबतर्फे मोफत होमिओपॅथिक सर्वरोग तपासणी व उपचार शिबिर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लबतर्फे मोफत होमिओपॅथिक सर्वरोग तपासणी व उपचार शिबिर

इचलकरंजी :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित डॉ. जे. जे. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत होमिओपॅथिक सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रोटरी श्रीमती सोनीदेवी रामविलास माहिती सेवा केंद्र, दाते मळा, महेश भवनजवळ, इचलकरंजी येथे होणार आहे. शिबिरात तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
यामध्ये पोट व आतड्यांचे विकार, मूत्रमार्गाचे आजार, छाती व श्वसनसंस्थेचे आजार, त्वचारोग, मेंदू व मज्जासंस्थेचे विकार, हाडे व स्नायूंचे विकार, मणक्याचे आजार, मान-कंबर-पाठदुखी, गर्भाशयाचे विकार, विविध प्रकारचे कर्करोग तसेच लहान मुलांचे आजार यांचा समावेश आहे.
शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील तपासणी अथवा शस्त्रक्रियेसाठी मोदी हॉस्पिटल, जयसिंगपूर येथे सवलतीच्या दरात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी इचलकरंजी व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच नावनोंदणीसाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, दाते मळा येथे संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लब व डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा