ICHMH51NEWS.IN
9921600800

हातकणंगले पोलीस ठाण्यातील POCSO प्रकरणात आरोपी पारस पुजारी यास जामीन मंजूर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हातकणंगले पोलीस ठाण्यातील POCSO प्रकरणात आरोपी पारस पुजारी यास जामीन मंजूर

इचलकरंजी :
 हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या POCSO कायद्यांतर्गत प्रकरणातील आरोपी पारस बाबासो पुजारी यांना मा. न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील तपास पूर्ण झालेला असून संबंधित आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
आरोपींच्या वतीने अ‍ॅड. ओंकार दत्तात्रय देवकाते यांनी प्रभावी व सखोल युक्तिवाद केला. तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपीकडून पुरावे नष्ट करण्याची किंवा तपास प्रक्रियेवर परिणाम करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. तसेच आरोपी न्यायालयीन कार्यवाहीस पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही नमूद करण्यात आले.
सर्व बाबींचा सखोल विचार करून मा. न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे आरोपी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा