स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबित; कोल्हाटी समाजाकडून आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी –
शहरातील कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न अद्याप प्रलंबित असून, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तात्काळ आवश्यक कामे पूर्ण न झाल्यास अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका प्रमिला जावळे व रवी जावळे यांनी दिला आहे.
कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये संरक्षण भिंत व हॉलचे काम पूर्ण झाले असले तरी समाजाच्या नावाची कमान, प्रवेशद्वार तसेच दहन कट्ट्याचे काम अद्याप झालेले नाही. तसेच नुकत्याच झालेल्या काही बांधकामाची समाजकंटकांकडून नासधूस करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या संदर्भात अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटनेच्या वतीने ऑक्टोबर २०२३ मध्ये संबंधित प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधांमुळे अंत्यविधी करताना समाजबांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी शांताराम लाखे, अशोक लाखे, प्रताप लाखे, भोपाल लाखे, बबन जावळे, पवन लाखे, विनायक जावळे, गुरु लाखे, सर्जेराव जावळे, विठ्ठल जावळे, भगवान लाखे, धमपाल जावळे, बाबा लाखे, संतोष लाखे, आनंदा लाखे, रुबन जावळे, दगडू लाखे, रंगा लाखे, सचिन जावळे, संजय लाखे, भीमा लाखे, विशाल लाखे, अक्षय जावळे, मोहन लाखे यांच्यासह समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरअभियंता क्षीरसागर यांच्याशी चर्चा करताना व निवेदन देताना नगरसेविका प्रमिला जावळे व रवी जावळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







