ICHMH51NEWS.IN
9921600800

तारदाळ येथे मतदान केंद्राबाहेर दमदाटी व धमकी; शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तारदाळ येथे मतदान केंद्राबाहेर दमदाटी व धमकी; शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इचलकरंजी :
 शहापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी विनोद दत्तात्रय कोराणे (वय ४१, व्यवसाय–व्यापार, रा. हनुमान नगर, तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी सौ. दिपाली विनोद कोराणे या कोरोची मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक २०२५-२६ साठी महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत.
७ फेब्रुवारी रोजी दुपारी जी. के. नगर, तारदाळ येथील अंगणवाडीतील बूथ क्र.१३ बाहेरच्या मैदानात मतदान केंद्रावरील यंत्रणेबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या पत्नी गेले असता, आरोपी राहुल ढवळे (रा. तारदाळ नाका), रणजित माने (रा. जी. के. नगर, तारदाळ), अमोल माळी (रा. रामनगर, तारदाळ) तसेच इतर १० ते १५ अनोळखी इसमांनी दमदाटी केली. यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलास शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेबाबत शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दाखल अधिकारी पो.हे.कॉ खोत आहेत. प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ.कोष्टी करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा