शिरोळ येथे पार पडलेल्या ‘छत्रपती चषक’ कराटे स्पर्धेत इचलकरंजीच्या स्वराज कांबळेंना दुहेरी सुवर्ण
इचलकरंजी
शिरोळ येथे कानिनजुकू कराटे स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘छत्रपती चषक’ राज्यस्तरीय तिसरी भव्य खुली कराटे स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत इचलकरंजीचा उदयोन्मुख खेळाडू स्वराज सचिन कांबळे याने उत्कृष्ट कामगिरी करत ब्लॅक बेल्ट गटात (१७ वर्षांखालील) ‘काता’ आणि ‘फाईट’ या दोन्ही प्रकारांत दोन सुवर्णपदके पटकावली.
स्वराजने सादर केलेली शिस्तबद्ध काता आणि आक्रमक-तांत्रिक फाईट कौशल्यामुळे परीक्षक व उपस्थितांची दाद मिळाली. या यशामागे कराटे प्रशिक्षक यासिन झांबरे सर तसेच श्री बालाजी पब्लिक स्कूल, टाकवडे येथील क्रीडा शिक्षक दिपक हेरवाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वराजच्या या यशाबद्दल कुटुंबीय, प्रशिक्षक,शाळा व्यवस्थापन आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले असून भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







