ICHMH51NEWS.IN
9921600800

लायन्स–केन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी विजेता,वेदांत बांगड उपविजेता

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लायन्स–केन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी विजेता,वेदांत बांगड उपविजेता

इचलकरंजी :
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन बुद्धिबळ अकादमी, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने आयोजित भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धा शनिवारी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकूण ७०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी हॉलमध्ये खुल्या गटात स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांत स्पर्धा घेण्यात आल्या. अंतिम निकालानुसार विवान सोनी याने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, वेदांत बांगड याने उपविजेतेपद तर शौर्य खावत याने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना चषक व रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. तन्मय पवार याने चौथा, जयेश मालपाणी याने पाचवा तर प्रथमेश लोटके याने सहावा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष संदीप सुतार, सचिव सचिन येलाजा, लिंगराज कित्तुरे, कृष्णावतार भराडीया आणि गजानन होगाडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ, राष्ट्रीय पंच मोहिनीराज डांगे आणि श्रुती कुलकर्णी उपस्थित होते. सोळा वर्षांखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून अथर्व तावरे, तेजस खावत, अभिशु पाटील (जयसिंगपूर), श्रेणीक देसाई (श्रद्धा ऑलिम्पियाड, इचलकरंजी) आणि अनिश कलवडे यांचा गौरव करण्यात आला. सर्वोत्तम मुलींच्या गटात सिद्धी कर्वे (जयसिंगपूर) आणि नंदिनी सारडा (अल्फान्सो स्कूल, यड्राव) यांनी बाजी मारली. तेरा वर्षांखालील उत्कृष्ट गटात दक्ष कारदगे आणि मृणाल पांडव (व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल, कबनूर) यांनी यश मिळवले, तर अकरा वर्षांखालील गटात दिविज कात्रुट (शांतीनिकेतन, कोल्हापूर) आणि श्रुती पांडव (व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल, कबनूर) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नऊ वर्षांखालील गटात शिवांश सुतार (समर्थ विद्यामंदिर, इचलकरंजी) आणि शनाया मालानी (किड्स व्हिला, इचलकरंजी) यांना गौरवण्यात आले, तर सात वर्षांखालील गटात जैन अधिरा आणि धीर पाटणी यांनी विशेष पारितोषिके पटकावली. सर्वोत्तम बुद्धिबळ शाळा म्हणून संजय घोडावत शाळा, अतिग्रे आणि समर्थ विद्यामंदिर, इचलकरंजी यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा