जोडीदाराची निवड ही विवेकीच असावी – श्री सुनील स्वामी
कन्या महाविद्यालयात अग्रणी योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी (प्रतिनिधी):
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत विवेक वाहिनी व गृहविज्ञान विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सुनील स्वामी (राज्य कार्याध्यक्ष, संविधान संवाद समिती, महाराष्ट्र) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी तरुणांनी वैवाहिक आयुष्याचा निर्णय घेताना संविधानातील मूल्यांचा आणि विवेकाचा आधार घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होऊन सुजाणपणे निर्णय घेण्याचे आवाहन केले.
प्रथम सत्रात अनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीमती रेश्मा खाडे यांनी जोडीदाराची निवड करताना कोणती दक्षता घ्यावी, यावर मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. सुनील गुरव होते.
दुसऱ्या सत्रात मानसशास्त्रज्ञ श्रीमती विभावरी नकाते यांनी विवाहपूर्व समुपदेशन आणि जोडीदाराची निवड करताना विचारात घ्यायचे मानसशास्त्रीय पैलू यावर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. धीरज शिंदे होते.
विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगावच्या प्रा.मुबिना मोमीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.संगीता पाटील यांनी केले. आभार श्रीमती प्रियांका साळोखे यांनी मानले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती हाळवणकर व श्रीमती प्रतिभा पैलवान यांनी केले.
या कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना सुनील स्वामी सर व्यासपीठावर प्रा.त्रिशला कदम व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







