इचलकरंजीत रविवारी ज्येष्ठ व्यावसायिकांचा सत्कार सोहळा
इचलकरंजी-
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने इचलकरंजी शहरातील, व्यवसाय आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी तीस वर्षांहून अधिक काळ सेवा प्रदान केली आणि ज्यांचे कार्य सातत्याने यशस्वीरित्या सुरू आहे अशा व्यावसायिकांचा, त्यांच्या क्षेत्रातील गौरवपूर्ण कामगिरीबद्दल तसेच इचलकरंजी शहरासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘रोटरी व्होकेशनल अवॉर्ड’ प्रदान करून गौरव करण्याचे येणार आहे. आंतरराष्ट्रीय रोटरीच्या व्होकेशनल सर्व्हिस अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या गौरव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे या नात्याने प्रकाशराव आवाडे (माजी वस्त्रोद्योग राज्यमंत्री) आणि सौ. किशोरीताई आवाडे (माजी नगराध्यक्षा) या उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपाल इंजि. अरुण भंडारे हे राहतील. याप्रसंगी सन्माननीय पाहुणे या नात्याने इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे व उप महापौर ॲड. अनिल डाळ्या, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यतिराज भंडारी हे उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या कार्यक्रमात मे. तुळजाराम सुरचंद शहा, येवारे स्टोअर्स, चौगुले डेअरी, जय जवान बेकरी, चारमिनार धोटे रिपेअरी वर्क्स, श्री बसवेश्वर ग्रेन मर्चंट, महिला वस्तू भांडार, सुनील हेअर ड्रेसर्स, मे. सुनीलकुमार कांतीलाल, तिवारे लाईट हाऊस, पुखराज ग्लास वेअर डेपो, मे. डी. बी. छाबडा, भाग्यरेखा चित्रमंदिर, जयशंकर पान भंडार, के. के. आर्टस, न्यू अलंकार शू सेंटर, किसान हार्डवेअर स्टोअर्स, श्री गणेश वेल्डिंग वर्क्स, अशोका ट्रॅव्हल्स, गजानन प्रिंटिंग प्रेस, सुधा साडी सेंटर, वहिदा मंडप डेकोरेटर्स, दिपाली ऑप्टिशियन, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आप्पा बापू घुणके, न्यू फॅशन टेलर्स, श्री दत्त शेतकरी सहकारी औषध दुकान, रशीद मतवाल आर्ट्स, विजय फ्लावर्स, श्री बालाजी सायकल, हॉटेल अक्षय, एस. एस. बोरगावे ऑटोमोबाईल्स आणि श्रीकृष्ण आयुर्वेदिक औषधालय यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदरचा कार्यक्रम रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे होणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







