शहापूर पोलीस ठाण्यात अतिक्रमणप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
इचलकरंजी
शहापूर पोलीस ठाणे येथे अतिक्रमणप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रल्हाद मोतीराम धागरे (वय ४१ व्यवसाय नोकरी, रा. निबांळकर वस्ती, गुजरवाडी रोड, दत्तनगर, कात्रज, ता. हवेली, जि. पुणे) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात कुमार श्रीशल्ल गुरव, अक्षता कुमार गुरव, श्रीशल्ल भिमु गुरव व मेघा श्रीशल्ल गुरव (सर्व रा. गट नं. 31/सी, प्लॉट नं. 53, रेणुकानगर, यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांना आरोपी करण्यात आले आहे.
दि. १३ फेब्रुवारी १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान यड्राव येथील गट नं. 31/सी, प्लॉट नं. 53 या ठिकाणी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित मिळकतीचा ताबा घेताना लावलेले सीलबंद कुलूप तोडून तसेच बँकेने लावलेली नोटीस फाडून आरोपींनी संगनमताने बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून मिळकतीत प्रवेश केल्याचा दाखल गुन्ह्यात आरोप आहे. हेड कॉन्स्टेबल बांगर यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंगसे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







