विकसित, सक्षम आणि आधुनिक इचलकरंजीकडे ठाम पाऊल : महापौर उदय धातुंडे
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका येथे महापौरपदी निवड झाल्यानंतर आज सोमवारी महापौर उदय धातुंडे यांनी प्रशासनासोबत पहिली आढावा बैठक घेत शहर विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
बैठकीत सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत शहरातील सुरू असलेली तसेच प्रस्तावित महत्त्वाची विकासकामे यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांची प्रगती तपासण्यात आली. शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सन २०४७ पर्यंतचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
“विकसित, सक्षम आणि आधुनिक इचलकरंजी घडवण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे,” असे आवाहन महापौर धातुंडे यांनी यावेळी केले. आयुक्त पल्लवी पाटील यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, सहायक आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
शहर विकासासाठी ठोस दिशा निश्चित करत महापौरांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका प्रशासनाने कार्याचा प्रारंभ केला असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बैठकीत बोलताना महापौर उदय धातूंडे,आयुक्त पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






