महासत्ता चौकातील मासे मार्केटमध्ये ५ लाखांची रोकड हिसकावली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
इचलकरंजी :
महासत्ता चौक येथील मासे मार्केट परिसरात ५ लाख रुपयांची रोकड हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाणे येथे अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफीक शमसुद्दीन सरकवास (वय ५३, व्यवसाय – ट्रॅव्हल्स, रा. ६१ ई, सदरबाजार, कोल्हापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान अनोळखी इसमाने गाडी खरेदी-विक्री संदर्भात कपटपूर्वक व अप्रामाणिकपणे दिशाभूल करून इचलकरंजी येथील महासत्ता चौकातील मासे मार्केट येथे बोलावले. त्याठिकाणी इतर दोन अनोळखी इसमांनी चोरीच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या हातातील सुमारे ५ लाख रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी बळजबरीने हिसकावून नेली व तेथून पळ काढला.
या प्रकरणी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा क्रमांक दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी पुनम माने करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







