ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन,उद्यानातील चबुतऱ्याची दुरावस्था

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन,उद्यानातील चबुतऱ्याची दुरावस्था

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने आज गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास, के. एल. मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोहळा फलकास, शंभुतीर्थ येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे प्रमुख उपस्थित होते. तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त विद्या कदम यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
याचबरोबर शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून स्वीकारलेले गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्यगीत वाजविण्यात आले.
महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक रवी रजपुते, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, ओंकार सुर्वे, नगरसेविका सरिता आवळे, धृवती दळवाई, सुरेखा जाधव, सपना भिसे, विद्या साळुंखे, अरुणा बचाटे, स्नेहल रावळ, ज्योती पाटील, शशिकला कवडे, वैशाली मोहिते, मोनाली मांजरे, शिवतीर्थ समिती अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, माजी नगरसेवक अजितमामा जाधव, भाऊसाहेब आवळे, शहाजी भोसले, राजू आलासे, प्रमोद बचाटे, नागेश पाटील, सीमा कमते तसेच सहा. आयुक्त रोशनी गोडे, शिक्षण अधिकारी बी. एम. कासार, विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहा. आयुक्त धनंजय पळसुले, रामचंद्र कांबळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, प्रदीप झमरी, उमेश कांबळे, सुनील बेलेकर, सुभाष आवळे, संजय कांबळे, आनंदा मकोटे, महेश बुचडे, सचिन शेडबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी उद्यानातील चबुतऱ्याची दुरावस्था

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांना मनपातर्फे अभिवादन करण्यात येते,याठिकाणी असलेल्या चबुतऱ्याची दुरावस्था झाली असून रंगरंगोटीचे सोपस्कार सुद्धा पार न पाडता शिवजयंती साजरी केली गेली.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना आ.राहुल आवाडे,महापौर उदय धातूंडे, उपमहापौर अनिल डाळ्या,आयुक्त पल्लवी पाटील
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा